Uttarang_Banner

Uttar Rang conference will be an event for the ageing diaspora of Marathi heritage attending the 2017 BMM convention – to reflect and act on their needs. It will create an engaging, educational program using interactive activities and multi-media that focuses on an inter-generational dialogue.

नमस्कार … उत्तर रंग, डेट्रॉईट च्या वतीने तुम्हाला हें आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण.

मंडळी, वाढवलो गेलो एका जगासाठी, आणि जगतो आहोत दुसऱ्याच परक्या जगांत, असं म्हणता-म्हणता­ आणि बघता-बघता, पन्नास-साठ वर्षं झाली की! अडीच-तीन पिढ्यांचा हा प्रवास … “इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी” असं म्हणत इथल्या निराळ्या मातींत आपली पाळं-मुळं आपण केंव्हाच खोलवर रुजवली देखील.उत्तर रंग चा हा समारंभ हा त्या प्रवासाचा आनंदोत्सव आहे.

“कशा साठी पोटा साठी, खंडाळ्याच्या घाटा साठी” म्हणता-म्हणता आपली गाडी आतां पुढच्या काहीश्या कठीण वळणावर वळते आहे.
पन्नास वर्षांपूर्वी साधी कोथिंबीर सांपडली तर कस्तुरी-मृग दिसल्याचा आनंद होणारे आपण… कित्ती मोठ्ठी परंपरा नेटानी, जाणीवपूर्वक सांभाळली आपण…
उद्या IMMIGRATION चे RULES बदलतील, GLOBAL ECONOMY बदलेल … आपलाच एखादा पणतू कदाचित जळगांवला करिअर शोधायला देखील जाईल. आपल्या ह्या EXCITING साहसाचे अवशेष कांही काळानंतर उत्खननांत सापडले ना FOSSILS म्हणून, तर पुढच्या पिढ्या नक्की त्यांची पूजा करतील.
पहिल्या पिढीच्या तुम्हा शिलेदारांना हा मानाचा मुजरा!

गुरुवार, जुलै ६, २०१७ रोजी सकाळीं ९ ते दुपारी ४ पर्यंत भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे तुमच्यासाठी.

Agenda

Topic Time Description
Breakfast 7:00 AM to 9:00 AM
The keynote theme
पुनर्नवा
9:00 AM to 10:30 AM
 • आयुष्याच्या उत्तरार्धात नव्या दिशांचा शोध – Finding meaningful life in senior years
 • Speakers:
  • Dr. Sudha Patil of Narmada Winery in VA
  • Ashok Sapre : Serious volunteering as second career
Panel discussion
नव्या दिशा – नवी अव्हानें
10:45 PM – 12:00 PM
 • Dr. Rajesh Mangrulkar – Physical disability problems in the elderly which come in the way of their goals and desires for a happy life.
 • Dr. Shobha Joshi – Psycho-social and emotional wellbeing of seniors.
 • Dr. Preeti Venkatraman – Social issues that interfere with seniors leading a productive life.
 • Dr. Medha Pradhan – Interventional pain management and body mechanics training for the prevention of problems in the elderly.
Lunch 12:00 PM – 1:00 PM भोजन
कांचनसंध्या 1:00 PM – 2:00 PM A Theater presentation
Informational Sessions
माहिती सत्रें
02:15 PM – 4:00 PM
 • Dr. Gajanan Sabnis – Financial and Tax Planning Advice especially for Seniors of Indian Origin and their Parents
 • Shri. Dhananjay Joshi – Overview of spiritual and other resources related to End-of- Life Issues
 • Dr. Sudhir Walavalkar – Elder Care with a Realistic but Compassionate Approach
 • Ms. Minoti Rajput – Estate Planning and Investment Strategies for Retirees and Long Term Care Planning

पुनर्नवा

स्वप्न फक्त तरुणपणीच पाहायची आणि म्हातारपण फक्त जुन्या आठवणी काढत ढकलायचं हा आपला पिंडच नाही. म्हणूनच “पुनर्नवा”!

सेवा-निवृत्ती नंतर कर्तृत्वाची दिशा बदलून पुन्हा स्वत:ला “नव्याने घडवणारे” ( Re-invent करणारे ) दोन मान्यवर डॉक्टर सुधा पाटील आणि श्री. अशोक सप्रे आपल्याला प्रमुख पाहुणे (Keynote Speakers) म्हणून लाभले आहेत.

“मोकळे जे हात, त्यांना निर्मितीचे डोहळे” असं म्हणतात ना?

वैद्यकीय व्यवसायांतून निवृत्त झाल्यावर द्राक्ष-वेलींना जोपासण्यापासून ते उत्कृष्ट प्रतीच्या आणि अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या “नर्मदा वाईन्स” पर्यंतचा असा अगदी वेगळा प्रवास करणाऱ्या डॉक्टर सुधा पाटील.

उत्तर अमेरिकेतल्या ज्येष्ठ मराठी नागरिकांना एकत्र आणण्याचा अविरत प्रयत्न करणारं दांपत्य – अशोक सप्रे आणि विद्या हर्डीकर-सप्रे. एक अभियंता म्हणून सेवा-निवृत्त झाल्यावर अशोक सप्रे यांनी केलेल्या सतत प्रयत्नांमुळेच हा उत्तर रंग चा सोहोळा. खास मराठी ज्येष्ठांकरिता बांधायच्या वसाहतींचं स्वप्न ते जोपासत आहेत.

डॉक्टर सुधा पाटील आणि श्री. अशोक सप्रे या दोन मातब्बर शिलेदारांशी हितगुज करायची ही सुवर्ण-संधी … पुनर्नवा.

नव्या दिशा - नवी आव्हानें

हें तर आपल्या परिषदेचं सूत्र-वाक्य!

नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी लागणारे बळ आणि धोरण (STRATEGY) , आणि त्या साठी लागणार आराखडा म्हणजे FRAMEWORK किंवा ROAD-MAP देणारं हें चर्चा-सत्र: तज्ञांशी संवाद.

आपलें कांही वक्तें आणि त्यांनी मान्यता मिळवलेली क्षेत्रं अशी आहेत …
Dr. Rajesh Mangrulkar – Physical disability problems in the elderly which come in the way of their goals and desires for a happy life.
Dr. Shobha Joshi – Psycho-social and emotional well-being of seniors.
Dr. Preeti Venkatraman – Social issues that interfere with seniors leading a productive life.
Dr. Medha Pradhan – Interventional pain management and body mechanics training for the prevention of problems in the elderly.

या कार्यक्रमाचं सूत्र-संचालन (COMPARING) करणार आहेत विद्या हर्डीकर-सप्रे.

कांचन संध्या

सकाळच्या भारदस्त चर्चा-सत्रांत आपण कठीण प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. मग आतां “उत्तर रंग” शीर्षकांतलें रंगही शोधायला हवेत, नाहीं का?

रुचि-पालट म्हणून दुपारच्या झकास भोजनानंतर आहे एक छोटंसं नाटुकलं: कांचन संध्या.

“आमची मुलं सुद्धा आता पन्नाशीला आलीत … किती दिवस भारतातल्या THEMES, PLOTS, CHARACTERS, आणि तिथल्या CELEBRITIES ना बघायचं? आम्हाला RELATE करतां येईल असं कांही दाखवा – आपल्या इथल्या आयुष्यात दाखवण्यासारखी कथानकंआणि विनोद काय कमी आहेत?” असें पडसाद गेल्या कांही संमेलनांत ऐकू आले. म्हणून डेट्रॉईटचें हौशी SENIOR CITIZENS एक नवा उपक्रम सुरूं करीत आहेत.

उत्तर अमेरिकेतल्या मराठी SENIORS साठी बांधलेल्या या “काल्पनिक” (FICTIONAL) वसाहतीचं नांव आहे KANCHAN SANDHYA VILLAGE. तिथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गमती-जमाती आणि सुख-दुःख दाखवणाऱ्या या आगामी मालिकेचा हा PILOT म्हणजे पहिला प्रयोग खास तुमच्या करता राखून ठेवला आहे. North American SITCOM STYLE ने (म्हणजे प्रासंगिक विनोदिका शैलींत) लिहिलेलं हें हलकं-फुलकं आणि खुसखुशीत नाटुकलं पाहण्याची संधी सोडू नका!

गुरुवारीं दुपारीं १ वाजतां … कांचन संध्या
लेखन आणि दिग्दर्शन: शुभदा शास्त्री.
उत्तर रंग डिट्रॉईटचे हौशी कलाकार: शरयू दळवी, पूनम वालावलकर, मेधा उमरजी, शैला फाटक आणि शीला करवंदे.

माहिती सत्रें

या माहिती-सत्रांत आपल्या जिव्हाळ्याच्या आणि महत्वाच्या खालील विषयांवर संबंधित तज्ज्ञांची भाषणं.

Ms. Minoti Rajput – Estate Planning and Investment Strategies for Retirees and Long Term Care Planning
Dr. Gajanan Sabnis – Financial and Tax Planning Advice especially for Seniors of Indian Origin and their Parents
Dr. Sudhir Walavalkar – Elder Care with a Realistic but Compassionate Approach
Shri. Dhananjay Joshi – Overview of spiritual and other resources related to End-of-Life Issues

उत्तरअमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळांतील ज्येष्ट नागरिक संस्थांचा परिचय.

तज्ञ वक्त्यांबरोबर प्रत्यक्ष (ONE-ON-ONE) संवांदांचीं BREAK-OUT SESSIONS.

या भरगच्च कार्यक्रमाकरिता आत्तापर्यंत जोरदार प्रतिसाद मिळतो आहे.तुमची जागा राखून ठेवण्यासाठी लवकारांत लवकर उत्तर रंग कार्यक्रमासाठी आपली नांवं REGISTER करा!

Visit BMM Uttar Rang for more information