Smarnika

‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ असं अभिमानाने सांगणारे आपण सारे उत्तर अमेरिकेतले मराठीजन! ‘मंत्र श्रमाचा, ध्यास गतिचा, गर्व मराठी संस्कृतीचा’ जपत गेले ४०हून अधिक वर्षें अमेरिका खंडात वसले, रुळले, रुजले ते मनी माय मराठीचं रोपटं घेऊन… बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०१७ च्या निमित्ताने प्रकाशित होणारी ‘स्मरणिका’ याच बोधवाक्याला अनुसरणारा एक दर्पण!!

 

भलेही इथली व्यक्ती महाराष्ट्रात जन्मलेली असो, वा अमेरिकास्थित मराठी कुटुंबात. आज उत्तर अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळ ज्या उंचीवर उभे आहे तिथून मागची वाट बघताना एक मूळ प्रश्न आवर्जून येतो. ‘गर्व मराठी संस्कृतीचा’ म्हणजे नेमके काय बरं? अमेरिकेत स्वतःचं मराठीपण जपत, पुढच्या पिढीला मराठी भाषा व संस्कृतीचं वाण कसं देऊ? या आणि अशा विभिन्न पैलूवरचं मंथन…

 

  1. प्रगतीची गती आणि संस्कृतीशी नातं जपताना
  2. गरज ‘मराठी’ ओळख निर्माण करण्याची
  3. मराठी संस्कृती अमेरिकन चष्म्यातून
  4. तरुण मुलामुलींसाठी – ‘अमेरिकन मराठीपण’, ‘मी मराठी, माझे मराठी’, ‘वंशद्वेष’ यावरचे विचार
  5. मराठी मनातून टिपलेल्या नजीकच्या काळातल्या महत्वपूर्ण वैश्विक घडामोडींवरचे विवरण. यामध्ये अमेरिकन निवडणूक २०१६, भारतीय विमुद्रिकरण (Demonetization), दहशतवाद यासारखे विषय जे वाचकांना माहितीपूर्ण ठरतील.
  6. स्मरणिकेच्या गाभ्याला स्पर्शणारे विचार-लेखन, कथा, कविता, अनुभव, प्रवासवर्णन, व्यंगचित्र, विडंबन आम्हाला जरूर पाठवा. स्मरणिकेला समरसेल अशा इतर साहित्याचंही स्वागत आहे.


– स्मरणिकेसाठी पाठवायचे साहित्य स्वतःचे व अन्यत्र प्रसिद्ध न झालेले असावे.
– मराठी आणि इंग्रजी भाषेतले लेखन स्वीकारले जाईल.
– मराठी लेखनासाठी कृपया गूगल मराठी वा Gmail अक्षरलिपी वापरा.
– लेखांसाठी शब्दमर्यादा सुमारे १२०० ते १५०० शब्दांपर्यंत.
– साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख ३१ मार्च, २०१७.
– आपले साहित्य आम्हाला sahitya@bmm2017.org या इमेलवर पाठवा.
– साहित्य निवडीचे सर्व अधिकार स्मरणिका संपादक समितीकडे राहतील.

Over the course of time, America has shifted from the ‘melting pot’ metaphor to a ‘tossed salad’; we blend in without losing our flavor. Aspects of our culture that were hitherto inaccessible outside of India are now at our fingertips – literally; thanks to our preferred electronic device. We may have lost some in translation (no pun intended) but we have gained much more with progress. That said, we are living in changing times. Technological, political and economical shifts are making us redefine ourselves. We, at BMM, would like to open the floor to writers and poets to explore one of the following topics:

 

  1. How do we strive for a life “Where the world has not been broken up into fragments by narrow domestic walls” (Rabindranath Tagore) while cherishing our own cultural heritage?
  2. Me Marathi, My Marathi
  3. Being American Marathi
  4. Overt / Covert Racism

Guidelines:

– Literature can be personal creation in Marathi or English and unpublished.
– Marathi articles, please make use of Google Marathi or Gmail font.
– Word limit for articles is 1200 to 1500 words.
– Last date for submission will be March 31, 2017.
– Send your submissions at sahitya@bmm2017.org
– Smaranika editor team reserves all rights to make selections.