singapore1

महाराष्ट्र मंडळ (सिंगापूर) – लखलखत्या सिंगापूर बेटावरील एक चमकता दीपस्तंभ. हा दीपस्तंभ भारतातील आणि इतर दूरदूरच्या ठिकाणांवरून आलेल्या मराठी लोकांसाठी आपल्या माणसांबरोबर चार घटका गप्पागोष्टी, विचारांची देवाणघेवाण आणि सणवार व मनोरंजन करण्यासाठी एक आपुलकीचे ठिकाण आहे.

घरापासून दूर असे आपले आणखी एक घर असे वाटणारे ममसिं हे मराठी बांधवाना एकत्र बांधून मराठी अस्मिता जपण्याचे मोठे कार्य १९९४ पासून करीत आहे. ममसिंचे जवळजवळ ७०० सक्रीय सभासद आहेत. मराठी समाजाला एकत्रित आणून विविध गुणांना वाव मिळवून देण्यासाठी एक मंच असलेले ममसिं म्हणजे महाराष्ट्र आणि अखिल भारताच्या समृद्ध संस्कृतीचे सम्यक दर्शन सिंगापूर रहिवाशांना घडवून आणते.

मराठी संस्कृती जपण्याच्या उद्देशाने ममसिं वर्षभरात विविध कार्यक्रम व सण साजरे करून संगीत, साहित्य, नाट्य, नृत्य कला, क्रीडा यातेल कौशल्याला सादर करते, आणि त्याबरोबरच सिंगापुरमध्ये सामाजिक जबाबदारीची कामे देखील करते.

सिंगापुरातील इतर सामाजिक संस्थांबरोबर एकत्रित कार्य करून, ममसिं एक जबाबदार नागरिक संस्था या नात्याने मराठी समाजाला स्थानिक लोकांसोबत जोडण्याचे आणि समाजातील गरजू घटकांना यथाशक्ती मदत करण्याचे महत्वाचे कार्य निभावते. यामध्ये आपण जिथे राहतो त्या समाजाचे देणे निदान काही अंशी तरी चुकते करण्याची भावना आहे.

दरमहा शब्दगंध हा स्वरचित कविताना वाहिलेला कार्यक्रम, ऋतुगंध हे ई-द्वैमासिक तसेच वार्षिक स्मरणिका हे नियमित साहित्यिक उपक्रम म्हणून चालविले जातात. शब्दगंध बैठका गेली अकरा वर्षे अव्याहत सुरु आहेत. यामुळे सभासदांच्या काव्यगुणांना वाव मिळाला आहे.
ममसिंचा स्वरगंध समूह संगीताचे विविध कार्यक्रम सादर करून सभासदांच्या कलेला मच उपलब्ध करून देतो. शब्दगंधच्या कविताना स्वरगंधतर्फे संगीत देऊन ममसिंच्या गायकांनी गायलेल्या गाण्यांची सुरेल मैफील २०१५ मध्ये सादर केली होती. ह्याच गाण्यांची “अद्वैताची गाणी” ह्या नावाचा अल्बम ममसिंने प्रकाशित केला आहे. ममसिंने २०११ मध्ये जागतिक मराठी साहित्य संमेलानाचे यजमानपद भूषविले आहे. तसेच २०१४ मध्ये एक गाजलेला रंगारंग कलामहोत्सव साजरा केला आहे. या व्यतिरिक्त दर वर्षी बालगोपालांसाठी सहल, नाट्य गान, चित्रकला अशा कार्यशाळा इत्यादी उपक्रमातून नवीन मराठी पिढीकडे मराठी संस्कृतीचा वारसा सोपविण्याचे कार्य देखील ममसिं करीत आहे.

A melting pot for Maharashtrians in vibrant Singapore, the Maharashtra Mandal (Singapore) (MMS) provides the platform where denizens of the most dynamic state in India meet, socialize, exchange notes and celebrate occasions – including festivals – all under one roof.

A home away from home, MMS endeavors to connect Maharashtrians with one another while sharing the spirit of Maharashtra.

Established in 1994, our member strength is about 700 active members. MMS’ prime aim is to do community building by providing a stage for showcasing member talent and also appreciating of the rich cultural heritage of Maharashtra, India and the world around us.

Towards that goal, MMS organizes various cultural events and activities through the year, which include festivals celebrations, celebration of arts and also many social causes.

MMS works closely with other social/cultural organizations in Singapore and participates in a variety of collaborative events that help our members to integrate with local diaspora and other Indian communities here.

We also strive to be a part of many social and local causes that come its way and thus give back to the society in a small way.

We run monthly meets of our Marathi Writer’s group Shabdagandha, run a bi-monthly marathi e-magazine Rutugandha and publish an annual souvenir maagzine Smaranika.

We also host various musical programmes under our music interest group “Swaragandha”.

We have succesfully released a book of our Shabdagandha writers and an album of our Swaragandha poets-singers-musicians. We were proud hosts of International Marathi Literature conference in 2011 and a Kala Mahotsav in 2014.

slide
Singapore_Centerspread