shanghai

शांघाय मराठी मंडळा बद्दल:

 

वर्ष 2002 मध्ये 4-5 मराठी कुटुंबे (अंदाजे 10 ~ 12 लोक) एकत्र आले आणि त्यांनी अतिशय अनौपचारिक शैली मध्ये शांघाय, चीन मध्ये गणेशोत्सव, संक्रांत आणि गुढी पाडवा घरगुती शैली मध्ये साजरा करायला सुरुवात केली. वर्ष 2007 ह्या गटाची ताकद 50 झाली. तेव्हापासून ह्या गटाचं नाव शांघाय मराठी मंडळ असं झालं.

वर्ष 2010 मध्ये मंडळ सदस्यत्व 170 प्रौढ आणि 45 मुले एव्हढं होतं. आम्ही आता सुमारे 140 प्रौढ आणि 40 मुलं आहोत.

या वर्षी आपल्या गणेशोत्सवाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात ह्या मंडळाने लोकांना एकत्र आणणे, उत्सव साजरे करणे, मुलांना मराठी परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणे, त्यांच्या प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं, इत्यादी कामे केली. आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे आम्ही सगळे घरा पासून दूर राहात असून पण या ठिकाणी घराच्या सारखे वातावरण तयार करून त्याचा आनंद मिळवू शकतो.

शांघाय मध्ये मराठी समुदाय लहान आहे ही प्रत्यक्षात आमची एक शक्ती म्हणायला हवी. एक मंडळ आणि निःस्वार्थी पणे केलेली समाजाची सेवा ही वृत्ती बाळगून आम्ही गेल्या काही वर्षांपासून दिलीप प्रभावळकर, अशोक पत्की, सुधीर गाडगीळ, शरद पोंक्षे, श्रीधर फडके अश्या ख्यातनाम कलाकारांचे कार्यक्रम शांघाय मध्ये आयोजित करण्यात यशस्वी झालो.

मंडळाची उद्दिष्टे :

  1. शांघाय आणि लगतच्या शहरातल्या मराठी कुटुंबियांना सर्व सामान्य विषयांवर चर्चा करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे.
  2. गणेशोत्सव, गुढी पाडवा, मकरसंक्रांत, कोजागिरी, सहली इत्यादी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करणे.
  3. मदत आणि देणग्या सारख्या उपक्रमांना हातभार लावणे.
  4. मिक्सरचं आयोजन करणे जेणेकरून आपल्यापैकी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील सभासदांचे अनुभव आणि त्यांच्या यशाचा फायदा बाकीच्या सभासदांना होईल. हा कार्यक्रम मराठी पाऊल पडते पुढे ह्या सदरा खाली आयोजित केला जातो.
  5. फेसबुक, ईमेल आणि व्हाट्सअँप सारखी साधने वापरून सर्व सभासदांना एकत्रित ठेवून त्यांच्या मध्ये सतत संवाद चालू ठेवणे आणि आपल्या नियोजित कार्यक्रमांची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देणे.

BMM 2017 पासून शांघाय मराठी सभासदांना सामाजिक उपक्रम, मनोरंजन, मुलांचे शिक्षण, रोजगार आणि व्यवसाय संधी अश्या विविध क्षेत्रात समन्वय प्राप्त करून देणं हे उद्दीष्ट.

Shanghai Marathi Mandal (SMM)

A small group of 4-5 Marathi families (approximately 10~12 people) came together in 2002 and started celebrating Ganesh festival, Sankrant & Gudhi Padwa in Shanghai, China in a very informal style. These programs used to be celebrated at one of the family home. By 2007, the group strength grew to about 50 members. This is when the social group acquired the name Shanghai Marathi Mandal.

By 2010 Group membership went up to 170 adults and 45 children. We are now about 140 adults and 40 children.

We are completing 10 years of Ganeshotsav Celebrations this year. This group has in the past achieved a lot in terms of getting people together, having fun, enjoying the festivals, passing on the traditions & culture to the younger generation, appreciating talents and giving opportunity to the talents within us.  And more importantly, making the place feel like our home even while we are physically away from our homes.

The fact that the Marathi community in Shanghai is small is actually strength in itself. The willingness to stay together under one group and the desire for selfless service has ensured that our Mandal, over the past few years, has been able to conduct events with celebrities such as Dilip Prabhavalkar, Ashok Patki, Sudhir Gadgil, Sharad Ponkshe, Shridhar Phadke and few others.

Objectives: The objectives of the Mandal are to:

  1. a) Provide a forum for individuals of Maharashtra origin in Shanghai & surrounding cities in which topics of common interest are discussed.
  2. b) Create social events, picnics and celebrate occasions & festivals like Ganeshotsav, Gudi Padwa, Makar Sankranti, Kojagiri, etc so that the community is able to interact together and for members to know each other better.
  3. c) Engage in and support activities that are oriented toward charity.
  4. d) Organize Mixers to highlight & share experiences of Marathi achievers in various fields. Such Mixers are organized under the name मराठी पाऊल पढते पुढे.
  5. e) Build and operate various social platforms to remain connected with the Marathi community like Facebook, Email & Whatsapp Group.

Visit to BMM 2017 would be to draw synergy in terms of social activities, entertainment, children’s education, employment opportunities & business ideas for our members.

shanghay_group1
shanghay_group2
shanghay_group3