Meena NerurkarDr. Parimal Kopardekar

डॉ. परिमल कोपर्डेकर

आकाशात तीन हजार कोटी, नव्वद दशलक्ष, त्रेचाळीस हजार, पाचशे बत्तीस तारे आहेत असं जर ‘मी’ सांगितलं; तर नक्कीच कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. पण हेच जर ‘असं मी नासाच्या साईटवर वाचलं’ असं म्हंटलं तर… ‘हो का! असेल बुवा!’ असं म्हणुन शरणागती पत्करतील.असा नावलौकिक आणि दबदबा असलेल्या नासा मध्ये Senior Technologist म्हणून काम करणाऱ्या डॉ. परिमल कोपर्डेकरांची मुलाखत घ्यायची वेळ आली तेंव्हा मला नाही म्हंटलं तरी थोडंसं दडपण आलं.

Read more

Meena NerurkarNikhil Dhurandar

डॉ. निखिल धुरंधर

“पंत, तुझी कुंभ रास आणि कुंभ लग्न आहे. नुसतं वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार!”. पु. ल. देशपांडेंच्या ‘बटाट्याची चाळ’ मधील उपास कथेतील ‘भिकोबा मुसळे’ नी पंतांना सांगितलेलं हे वजनाबाबतचं गुपित माझ्या मनात नेहमी घुमत असतं. इकडे कथेतल्या पंतांप्रमाणे माझं वजनसुद्धा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आणि तिकडे तो अभिनेता आमीर खान एका सिनेमामध्ये ३० किलो कमी करतो! काय हा चमत्कार! योगायोगाने या चमत्कारामागच्या खऱ्या ‘योग्याशी’ बोलण्याची संधी मला मिळाली. तो विज्ञाननिष्ठ योगी म्हणजे डॉ. निखिल धुरंधर.

Read more

meena nerurkarDr. Meena Nerurkar

डॉ. मीना नेरुरकर

डॉ. मीना नेरुरकर (http://www.meenanerurkar.com/)….. बस नाम ही काफी है….. मीनाताईंविषयी असं जर म्हंटलं, तर ते अजिबात वावगं ठरणार नाही.
‘अ डॉट कॉम मॉम’ या आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस त्या डेट्रॉईटला आल्या असतांना त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग जुळून आला. गप्पांच्या सुरुवातीलाच “BMM च्या ‘प्रकाशझोत’ मालिकेसाठी काही बोलूयात का?” असं विचारल्यावर काहीही आढेवेढे न घेता त्या बोलत होत्या. खरं म्हणजे या लेखामुळे मीनाताईंवर प्रकाशझोत पडण्याऐवजी; त्यांच्यामुळे ही मालिकाच प्रकाशझोतात येण्याची बरीच शक्यता आहे.
Read more

vilas thuseManohar Saradeshpande

मनोहर सरदेशपांडे

काकांना निदान डेट्रॉईटच्या महाराष्ट्र मंडळात तरी सगळे जण ओळखतात असा आपला माझा समज होता. पण काही वर्षांपूर्वी झालेल्या एका गाण्याच्या कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांपैकी एका
बाईंनी काकांना “तुम्ही कोण?” असं विचारून माझी विकेट काढली (काकांची नाही)…. चूक बाईंची नव्हती, काकांच्या प्रसिद्धिपराङमुखतेची होती. काकांनीसुद्धा विचारलेल्या प्रश्नाला अत्यंत खिलाडूपणे, “आमच्या हिला सगळेजण ओळखतात, मला कोणीही नाही.” असा प्रमिलाकाकूंकडे अंगुलीनिर्देश करत खुलासा केला…..
Read more

vilas thuseManasi Karandikar

मानसी करंदीकर

तवाली नार: मानसी करंदीकर
पूर्वाश्रमीची उज्ज्वला सुळे १९८१ साली विवाहबद्ध झाली आणि ‘मानसी करंदीकर’ होऊन ती १९८२ साली अमेरिकेत दाखल झाली. मुंबईत बँक ऑफ इंडिया मध्ये ५ वर्षं नोकरी केली. इथे नोकरी व संसार … वरवर पाहता ही कहाणी परिचित वाटते. परंतू वास्तव थोडे वेगळे आहे. व्यक्तिगत आयुष्यात काही सखे सोयरे यांनी कठीण परिस्थितीत दगा दिला. अगदी पांडवांच्या मयसभेत यावेत तसे अनुभव आले, जमीन म्हणून विसाव्यासाठी पाय टेकवावा तर आगीचा चटका बसावा असे. तरीही कडवटपणा न येता भूतकाळाच्या नकारात्मक सावटातून बाहेर येऊन..
Read more

vilas thuseSameer Sarvate

समीर सरवटे

निव्वळ आकडेवारीच्या भाषेतच सांगायचं झालं तर – दर महिन्याला एकशे पंचाहत्तर देशातून सरासरी एक लाख ब्यांण्णव हजाराहून अधिक लोक मायबोलीच्या साईटला भेट देतात. साईटवरचा वाचक सरासरी नऊ मिनिटे वाचन करतो. आणि दर महिन्याला २४ लाखाहून अधिक पाने वाचली जातात. फेसबुकवर एक लाख सोळा हजार आणि गुगल प्लसवर तीन लाखाहून अधिक followers आहेत.
Read more

vilas thuseVivek Sagdev

विवेक सगदेव

नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी घरी आलो…… घराजवळ येताच सवयीप्रमाणे गाडीतल्या गॅरेज डोअर ओपनरचं बटण दाबलं…. पण गॅरेजचं दार काही उघडलं नाही…. अगदी जवळ आल्यावर, गाडी थांबवून परत बटण दाबलं…. तरी दार उघडायला तयार नाही…. चडफडत गाडीचं दार उघडलं, खाली उतरलो, गाडीचं दार बंद केलं…… घराच्या दाराजवळ गेलो; तर लक्षात आलं की घराची किल्ली गाडीतच आहे…. शिव्या घालत (स्वतःला) परत गाडीजवळ आलो…. दार उघडलं, किल्ली काढली, दार लावलं. घराच्या दाराजवळ गेलो, किल्ली लावून घराच दार उघडलं, आत येऊन गॅरेजचं दार आतून उघडलं…. त्या उघडलेल्या दारातून बाहेर येऊन गाडीचं दार उघडून परत गाडीत बसून गाडी नीट गॅरेजमधे लावली……
Read more

vilas thuseVilas Thuse

विलास ठुसे

विलास ठुसे : एक हरहुन्नरी मनुष्य!
पुणे तिथे काय उणे? ७५ निरांजनांच्या ताटापासून (Spanish) ‘झारा’च्या स्कर्टापर्यंत सगळं मिळतं! मग अभियांत्रिकी शिक्षण घेउन अमेरिकेत स्थायिक झाल्यावर पौरोहित्य शिकणारा पंडित तिथे ‘पैदा’ झाला तर नवल नाही! त्याचं असं झालं…
श्री.विलास ठुसे मूळचे संगमनेरचे, परंतु शिक्षण पुण्याचे. पुणे, धरणगाव, प्रताप कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे ही महाराष्ट्राशी दृढ नाते सांगणारी नावं (आणि गावं) उच्चारत संभाषणाला सुरुवात झाली. योग्य शिक्षण, मेहनत, नशीब याशिवाय यशस्वी होण्यासाठी एक वेगळाच गुण लागतो – आयुष्याकडे चाकोरीबाहेरून बघण्याचा.
Read more

अभिजित घोलप

Abhijeet Gholap

अभिजित घोलप

“अजि म्या ब्रह्म पाहिले”……. च्या चालीवर; “आज मी ‘Midas’ शी बोललो”…… अशी काहीशी माझी अवस्था, “अभी”शी बोलल्यावर झाली होती.
अभिजित घोलप……. हा माणूस IIT (मुंबई) इथून graduate होतो काय……. अमेरिकेत येऊन नाममात्र भांडवलावर Bio Imagene कंपनी सुरु करतो आणि अवघ्या दहा वर्षात hundred million पर्यंत वाढवतो काय……. काही वर्षांसाठी भारतात परत जातो आणि सिनेमा निर्मितीसारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात पदार्पणातच ‘देऊळ’ सारख्या अभिजात कलाकृतीची निर्मिती करतो काय……

Read more

मुकुंद मराठे

मुकुंद मराठे

Mukund Marathe

मुकुंद मराठे

पुरे झाली आता तुझी नाटकं. तेच लक्ष जरा अभ्यासात घाल”. असं “प्रोत्साहन” जर घरच्यांकडून मिळालं असतं तर मुकुंद मराठे या रंगयात्रीची नाट्यप्रेमाची हरळी बालपणीच उपटली गेली असती. पण सुदैवाने तसं झालं नाही; त्यामुळे बे एरीयातल्या लोकांना एक धडपड्या, नाटकांना वाहून घेतलेला अभिनेता, दिग्दर्शक, समन्वयक अशा एकापेक्षा एक विविध रुपात मुकुंद मराठे बघायला मिळाला. मुकुंदच्या मातोश्री स्वतः उत्तम लेखिका, घरात नाटकांविषयी, संगीताविषयी पोषक वातावरण अशा कलासक्त पार्श्वभूमीचा कळत नकळत परिणाम मुकुंदमधील कलाकाराच्या जडणघडणीवर होत होता.

Read more

Prakash ZotatDr.Makarand Gore

डॉ. मकरंद गोरे

डॉ. मकरंद गोरे…… अडीचशेच्या वर शोध निबंध, पंचावन्नच्या वर पेटंटस, Hewlett-Packard ची अकरा स्टार ऍवार्ड्स आणि इतर बरंच काही… असा ढाई किलोचा resume वाचला की जरा दडपायलाच होतं. मुलाखत घ्यायच्या आधी जरा तयारी करावी म्हणून साहेबांच्या Linked-In च्या पानावर त्यांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला……
जुन्या अकरावीची शेवटची बॅच व नवीन बारावीची पहिली बॅच एकत्र आल्याने विद्यार्थी तर वाढलेले होते पण मेडिकलच्या सीट्स तर काही वाढलेल्या नव्हत्या. त्या गोंधळात मेडिकलची ऍडमिशन एका मार्काने हुकलेली…. त्यानंतर आलेली उद्विग्नता, झालेली चिडचिड आणि त्यातूनच केलेला दृढनिश्चय – मी डॉक्टर तर होईनच पण त्यापुढेही जाईन….

Read more

subhashMr.Subhash Gaitonde

श्री.सुभाष गायतोंडे

It gives us great pleasure to introduce Shree. Subhash Gaitonde: an enterprising builder, avid BMM-goer, and an ardent devotee of classical music. He came to Seattle in 1970 to study architecture; a field less inhabited by immigrants even now.

Read more

shubhada-300x300Shubhada Kamerkar

शुभदा “शुबी” कामेरकर

“टवाळा आवडे विनोद” असं संत रामदास नाराजीच्या सुरात म्हणाले असले तरी आपल्याला सर्वांना टवाळक्या करायला आवडतात! “फक्त आपण टवाळक्या करतो हे इतरांना कळलेले आपल्याला आवडत नाही…” हे बोलताना शुभदाताईंनी मारलेला डोळा मला फोनवरून देखील दिसला. २०११ साली डेट्रॉइटच्या रंगमंचावर पाहिलेला त्यांचा हसरा चेहरा लगेच माझ्या डोळ्यासमोर आला. ‘उभ्या उभ्या विनोद’ हा stand up comedyचा मराठी (“सोवळा”) अवतार. दिवाळीचं पावित्र्य, मराठी माणसाची मानसिकता आणि प्रसंगाचं औचित्य यांचं भान ठेवून शुभदा कामेरकर यांनी त्यांच्या चमूसह केलेले विनोद डेट्रॉइटकरांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते …

Read more

AtulGovande-300x300Atul Govande

श्री. अतुल गोवंडे

“मुलाखत घेऊ का हे विचारणारी तुमची इमेल आली तर मला आधी वाटलं SPAM आहे की काय…” या त्यांच्या मिश्किल विधानाने आमच्या गप्पांना सुरुवात झाली.
त्यांचा जन्म जमशेदपूरचा, शिक्षण व वास्तव्य पुण्यात. १९९२ साली प्रशिक्षणानिमित्त ते डेल्टा टाउ या कंपनीत आले आणि इथल्या कामाच्या पद्धतीवर खूष झाले. अमेरिकेत यायचं यापेक्षा या कंपनीत यायचं असा ध्यास त्यांनी घेतला. परंतु ती इच्छा पूर्ण होइपर्यंत १९९७ साल उजाडले.

Read more