parth

‘आपली मराठी, आपले विश्व: Maharashtra Mandal of Perth, Australia’

महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेची माहिती:

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी |धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,एवढ्या जगात माय मानतो मराठी ||

कविवर्य सुरेश भट यांच्या या रचनेतून प्रेरणा घेउन आपली मराठी मातीशी असलेली नाळ जपण्यासाठी पर्थ महाराष्ट्र मंडळ हे २००२ सालापासून कार्यरत आहे.महामंडळाचे सदस्यत्व हे सर्व मराठी भाषिक व महाराष्ट्राशी बांधिलकी असणार्‍या लोकांसाठी खुले आहे.

महामंडळ स्थापनेमागची प्रमुख उद्दीष्टे खालीलप्रमाणे आहेत –

१. मराठी भाषेचा प्रचार व्हावा.

२. मराठी साहित्याचा प्रसार व्हावा.

३. मराठी संस्कृतीशी संपर्क टिकून रहावा.

४. आपसातले ऋणानुबंध वाढवण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे.

या अनुषंगाने दरवर्षी महामंडळातर्फे महाराष्ट्र आणि मराठी भाषेशी जोडलेले सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्रातील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

राबवण्यात येणारे उपक्रम:

१. चैत्रपाडवा, महाराष्ट्र दिन, गणेश उत्सव, दिवाळी कार्यक्रम हे प्रमुख साजरे केले जाणारे दिवस.

२. महिन्यामध्ये पाचवा शुक्रवार असला की पर्थमधील देवळामध्ये प्रसादाचा कार्यक्रम. (मंडळाच्या सदस्यांकडून प्रसाद होस्ट केला जातो.)

३. दर तीन महिन्यांनी ’रेडिओ संगम पर्थ’तर्फ़े’ FM95.3 वरुन मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जातो.

४. वर्षभरात भेटीला येणार्या मराठी सेलेब्रिटींसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन.

५. मराठी सिनेमांचे स्क्रिनिंग. (‘सैराट’चे स्क्रिनिंग नुकतेच पार पडले.)

६. स्पोर्ट्र्स इव्हेंटचे आयोजन. “क्रिकेट इव्हेंट” नुकताच पार पडला. बाकी खेळांचेही येत्या वर्षात आयोजन.

७. स्थानिक कलाकारांना घेऊन कार्यक्रमाचे आयोजन. गायक, वादक, चित्रकार इ. आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ.

८. वार्षिक सर्वसाधारण सभा एखाद्या पार्कमध्ये घेऊन सहकुटूंब सहलीचे स्वरुप. (वर्षातून किमान एक तरी पिकनिक.)

९. फ़ेसबुक, ईमेल्स, वेबसाईट आणि व्हॉटसएपवरुन जास्तीत जास्त संपर्काचा प्रयत्न.

१०. मंडळाची स्वत:ची लायब्ररी असून सदस्यांना पुस्तके वाचायला तीन आठवड्यांच्या मुदतीवर दिली जातात.

११. मंडळाच्या घडामोडींचा आढावा घेणारे क्वाटरली न्यूजलेटर.

 

लोकांचा मिळणारा प्रतिसाद:

प्रत्येक कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती. कार्यक्रमाच्या स्वरुपावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ह्या वर्षीच्या कमिटीपासून इतर बऱ्याच बाबतीत सभासदांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.

सदस्य संख्या:

प्रसादाच्या कार्यक्रमापासून ते सेलेब्रिटी उपस्थित असलेल्या कार्यक्रमांना दोनशे ते अडीचशे उपस्थिती असते. पर्थच्या एकूण मराठी लोकसंख्येच्या ही पन्नास ट्क्के उपस्थिती असावी. ही टक्केवारी जास्तीत जास्त वाढवण्याचा नविन कमिटीचा प्रयत्न.

भविष्यातील योजना:

 • जास्तीत जास्त लोकसंग्रह. कार्यक्रमांत लोकसहभाग.
 • नव्यानेच पर्थमध्ये येणार्या मराठी लोकांसाठी मार्गदर्शक फ़ोरम.
 • मराठी सिनेमा किंवा नाटक पर्थमध्ये उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न.
 • मराठी भाषा आणि संस्कृती नवीन पिढीला समजण्यासाठी काही विशेष कार्यक्रम.

Maharashtra Mandal of Perth, Australia was established in 2002 to nurture Marathi culture. Its membership is open to all Marathi speaking people related to Maharashtra.

We have following goals:

– Spread Marathi language.

– Spread the Marathi literature.

– To connect, nurture and maintain connection with Marathi culture.

– To provide platform to nurture and grow the brotherhood among the Marathi community.

Based on the above objectives, we arrange many programs related to Marathi culture, art and literature.

Some of the programs:

 1. Chaitra Padawa, Maharashtra Day, Ganapati Festival and Diwali are the primary days.
 2. If there is a fifth Friday in a month, then we host “Prasad” in the temple.
 3. Presentation of Marathi songs on FM95.3 Radio Sangam Perth.
 4. Special programs for visiting Marathi celebrities.
 5. Screening of Marathi movies.
 6. Sports events, such as cricket.
 7. Provide platform for local singers, musicians and other artists.
 8. Annual General Body accompanied with picnic.
 9. Maximum contacts through Facebook, emails, web site and Whatsapp.
 10. Loaning Marathi books from its own library.
 11. Quarterly newsletter.

Response from the community:

We get excellent response from the community. While actual attendance depends on the type of the programs, general response this year has been fantastic. We get 200-250 people in most programs, which is probably 50% of the total Marathi population in Perth.

Future plans:

– Maximum participation and attendance of people.

– Forum for new Marathi immigrants in Perth.

– Try to get Marathi movies and drama in Perth.

– Few special programs for new generation to enhance their interest in Marathi language and culture.

Perth Collage 2
Perth Collage