New England Marathi Mandal

पेटवा मशाल – न्यू इंग्लंड मराठी मंडळ (NEMM)

न्यू इंग्लंड मराठी मंडळ

न्यू इंग्लंड मराठी मंडळ १९७३ पासून न्यू इंग्लंड भागामध्ये कार्यरत आहे. आपल्या सर्वाना आपल्या भाषेचा  आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान आहेच.  वर्षभर होत असलेल्या आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या रूपाने आम्ही तो वारसा जपण्याचा आणि वृद्धिंगत करण्याचा जरूर प्रयत्न करत असतो. आमच्या मंडळाने आज पर्यंत अनेक सुंदर कार्यक्रम सादर केले आहेतच. त्या बरोबरच दोन वेळा BMM चे अधिवेशन आयोजित करण्याचा सन्मानही मंडळाला मिळाला आहे !

न्यू इंग्लंड मराठी मंडळाची कार्यकारणी समिती (committee) आमच्या सभासदांसाठी भारतातून आणि अमेरिकेतून दर्जेदार कार्यक्रम आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. या वर्षी आम्ही गंधर्व आणि सेल्फी नाटक असे निवडक आणि रसिकप्रिय कार्यक्रम आयोजित केले. मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांना सामावून घेण्यावर आमचा नेहमीच भर असतो. गेल्या वर्षीच्या गणेश उत्सव कार्यक्रमामध्ये विविध वयोगटातील १०० पेक्षा अधिक कलाकारांनी भाग घेतला. ज्या समाजाचे आपण घटक आहोत, त्या समाजविषयी पण आपण काही करायला पाहिजे अशी मंडळाची भावना आहे. मंडळाने गेल्या वर्षी दुष्काळ पीडित शेतकऱ्याच्या मदतीसाठी फंड-रेजर आयोजित केला होता. तसेच १० पेक्षा जास्त नॉन-प्रॉफिट आणि सामाजिक संस्था साठी showcase कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आमचे मंडळ ‘अनुबंध’ हे त्रैमासिक चालवते आणि अंक आमच्या वेबसाईट (www.nemm.org) च्या मार्फत प्रसिद्ध होतात. या मध्ये स्थानिक लेखक/कवी/चित्रकार याच्या कला गुणांना वाव देणे हा उद्देश असतो. पण जगभरातून कोणासही आम्हाला आपले साहित्य पाठवायचे असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

BMM २०१७ च्या अधिवेशनाचा जय्यत तयारी सुरु झालेली आहेच आणि आम्ही सर्व जण अधिवेशनास उपस्थित राहण्यास खूप उत्सुक आहोत. अमेरिकेच्या विविध भागातून  शब्दरूपी मशाल नेण्याचा अभिनव प्रकल्प हाती घेतल्या बद्दल BMM २०१७ च्या कार्यकर्त्याचे आभार.

मिशिगनच्या आकाशात भरून येतायत

मेघ कलेचे विशाल,

आमच्यासोबत सहभागाची

पेटवा तुम्ही मशाल!

New England Marathi Mandal (NEMM)

NEMM has been serving Marathi community in the great New England area (Massachusetts, New Hampshire, Rhode Island, Connecticut, Vermont and Maine) since 1973. We are proud to inherit and preserve Marathi culture through various cultural activities throughout the year. Over the years, we have produced and arranged several quality programs. We are also proud to host 2 BMM conventions so far.

The NEMM committee has been focusing on bringing fantastic programs from India and US to our audience. This year we already hosted program Gandharva and Selfie play from India. We also encourage community involvement and engagement through our programs and initiatives. Last year’s Ganeshutsav program had 100 plus local participants from various age groups. We also believe that as a true community organization, we should not restrict our focus to cultural activities only. Rather we should encourage and support the non-profit organizations working for the social issues. Last year other than raising money for farmers, we also arranged a program to show case the work of 10+ non-profit organizations working for the betterment of society.

NEMM also publishes quarterly magazine ‘Anubandh’ in Marathi on our website www.nemm.org. The contributions typically comes from local community but we would be happy to receive contributions from people across the world.

BMM2017 preparations have started with a lots of enthusiasm and we are equally excited to support the convention. We are so happy to light up the torch and start its journey from the east coast !