maskat

मस्कत मराठी मित्र मंडळ (4M) हा भारतीय सांस्कृतिक क्लब चा मराठी विभाग आहे. आमचं उद्दिष्ट म्हणजे मस्कत मध्ये स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांना आणि विशेषतः मुलांना मराठी संस्कृतीची ओळख करून देणे आणि महाराष्ट्राशी नातं जपून ठेवणे . त्यासाठी आम्ही बरेच स्थानिक कार्यक्रम करतो. त्यात संगीत, नाटक, निरनिराळ्या स्पर्धा इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. पण त्याचबरोबर आम्ही भारतातून व्यावसायिक कार्यक्रम सुद्धा आणतो.नुकतेच आमच्या कडे पंडित हृदयनाथ मंगेशकर येऊन गेले. त्याआधी आम्ही “गोष्ट एका काळाची, काळ्या पांढऱ्या पडद्याची” हा कार्यक्रम २०१४ साली केला. आमच्या येथे हृषीकेश, प्रमोद आणि प्राजक्ता रानडे ह्यांनी गीत रामायण सादर केले आहे. Niche Entertainment तर्फे “एक होत्या शांताबाई” हा अफलातून कार्यक्रम झालेला आहे.मराठी माणूस नाटकवेडा असतो. त्यामुळे साहजिकच गेल्या दोन वर्षात “गोष्ट तशी गमतीची”, “जो भी होगा, देखा जायेगा” अशी नाटके सुद्धा झालेली आहेत. ह्या वर्षी आमच्याकडे एकांकीका स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या आहेत.

 

पण आमच्या मंडळाचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राची लोकधारा ते महाराष्ट्राची स्फूर्ती स्थाने (जेंव्हा डॉ. मोहन आगाशे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.) पासून ते ह्यावर्षी महाराष्ट्राची नभोवाणी पर्यंत आम्ही प्रत्येक महाराष्ट्र दिनी स्थानिक कार्यक्रम करतो. इथले कलाकार त्यावेळी संगीत आणि नृत्याचे वेगवेगळे कार्यक्रम सादर करतात. थोडक्यात, आमची नाळ महाराष्ट्राशी अगदी चांगली जोडलेली आहे.

 

जय महाराष्ट्र!!

Muscat Marathi Mitra Mandal – 4M, the Marathi Wing of the Indian Social Club Oman works with the following objective – gives some elements of our Marathi culture to Marathi families including children. We do that through a host of in house programs including music, theatre, quizzes, etc.. and professional programs from India. We had Pandit Hridaynath Mangeshkar performing in Muscat in 2015 and earlier we hosted “Gosht eka kaalachi, kalya pandhrya padadyachi” in 2014. We have had Ranades (Pramod, Hrishikesh and Prajakta) singing Geet Ramayan, and Niche performing Ek Hotya Shantabai.. Various plays including “Gosht tashi Gamtichi”, “Jobhi hoga dekhajaega” have been held here.

 

This year we will be having an ekaanki spardha.

 

Maharashtra Din celebrations are the highlight of our annual programs. From Maharashtrachi Lokadhara, to Maharashtrachi Spurtithana (where Dr. Mohan Agashe was the chief guest) to this year – Maharashtrachi Nabhovani – we do an in house program every year with local artists singing as well performing dances of Maharashtra.

muscat-marathi-mandal-committee
muscat-marathi-mandal-program-glimpse