anjali_anturkarअंजली अंतुरकर, २०१७ अधिवेशन

Anjali Anturkar, BMM 2017 Convention Convener

नमस्कार मंडळी,

 

BMM २०१७.. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या ह्या १८व्या अधिवेशनात तुमचे सहर्ष स्वागत! महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉइट (MMD) जुलै २०१७ मध्ये, केवळ नॉर्थ अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी बांधवांचा पाहुणचार करण्यास उत्सुक आहे. एवढं मोठं अधिवेशन करायचं म्हणजे सोपं काम नाही. पण डेट्रॉइटच्या माणसांनी दाखवलेली कष्टाची तयारी, इतर मंडळांनी दाखवलेला विश्वास आणि देऊ केलेला मदतीचा हात, ह्या जोरावर आम्ही हे शिवधनुष्य पेलण्यास सज्ज होत आहोत.

 

आपलं अधिवेशन कसं असावं ह्याबद्दल आम्ही जाणकारांशी, मित्रमंडळींशी बरीच चर्चा केली. अमेरिकेत राहण्याऱ्या आणि पूर्वी अधिवेशनांत सहभागी झालेल्या अनेकांची मते जाणून घेतली. ह्या अभ्यासामुळे आपल्या अधिवेशनात होणाऱ्या कार्यक्रमांचे आणि जेवणाचे नियोजन करण्यास आम्हांला विशेष मदत होत आहे. ‘अतिथी देवो भव’ चे व्रत प्रत्येक स्वयंसेवकाने मनात रुजवले असून आपल्या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या लोकांचा अनुभव अत्यंत सुखद असेल, ह्याची मी आपणास ग्वाही देते.

 

नियोजनाच्या पायरीपासूनच आम्ही मुलांना आणि तरुणांना अधिवेशनाच्या तयारीत सहभागी करून घेतले आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन हा ह्या मंडळींसाठी मराठी संस्कृतीच्या जवळ जायचा मार्ग असतो. त्यांची आपापसातली मैत्री वाढावी, नवीन ओळखी व्हाव्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना अधिवेशनात मजा यावी हा त्यामागचा उद्देश! विशेष करून ‘मुलांसाठी आणि तरुणांसाठी’ ह्या मंडळींनी खूप धमाल गोष्टींचे नियोजन केले आहे.

 

ज्या लोकांनी हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी देणगी देऊ केली आहे त्यांचे मी विशेष आभार मानते. आपल्या आशीर्वादामुळेच हे अधिवेशन अधिक यशस्वी होईल आणि आपण सहभागी होणाऱ्या लोकांना ३ दिवसांकरता एक अद्भुत आनंद देऊ शकू असा मला विश्वास वाटतो.

 

२०१७ ला जणू आपल्या घरीच गणपती बसतोय, असं वातावरण सध्या डेट्रॉइटमध्ये आहे. ह्या उत्सवात आपणही सहभागी व्हा, कला-संस्कृती-भाषेच्या ह्या आपुलकीच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हा, असे मी आपणास आवाहन करते.

 

आपलीच विनम्र,

अंजली अंतुरकर

(संयोजक)


Namaskar,

Welcome to the 18th BMM Convention! In July 2017, Aaple Mandal, Maharashtra Mandal of Detroit is eager to host and extend our hospitality to not only the people from North America, but from the entire world!

Organizing such a mammoth event is certainly not an easy task. On the strength and support – emotional, monetary, material and physical – from MMD members, other Mandals, and our well-wishers and donors, we are enthused to venture into this herculean task.

We have had exhaustive discussions and deliberations with our friends, well wishers, experienced and knowledgeable experts, in working out the nittygritties of this program. We asked for the opinions and advice of those who planned and participated in earlier conventions. Our listening has proved to be very valuable in chalking out the planningof aaple convention. Our devoted volunteers are committed to offering their best to our beloved invitees.

The organizing committee has involved our children and the youth right from the planning stages of this function. The convention provides them a golden opportunity to reinforce their mutual friendships, make new friends and acquaintances and experience firsthand, the universal Marathi culture. And most crucial of all – utmost care is being taken that these millennials are hooked to the entire proceedings of this convention by incorporating events aligned to their taste and liking.

Our special appreciation and gratitude goes to our donors and to the ones pledging donations for aaple convention. Your blessings will go a long way in making this convention a success.

BMM 2017 Convention has brought fervor much like the Ganesh Festival, to Detroit.  It’s my humble appeal to all of you to witness this enchanted environment of Maharashtrian art, culture and language, and carry its sweet memories when you return back home.

Yours, in gratitude,

(Anjali Anturkar)

Convener, BMM 2017