niteen_joshi

नितीन जोशी, बृहन्महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष

Niteen Joshi, BMM President

नमस्कार मंडळी,

 

मी नितीन जोशी, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १८ व्या अधिवेशनाच्या संकेतस्थळावर सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र मंडळ डेट्रॉइटच्या अनेक स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागाने हे अधिवेशन यशस्वी होणार ह्यात शंकाच नाही. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने मी आपणा सर्वांना ह्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण देतो.

 

मंडळी, ह्या अधिवेशनांच्या निमित्ताने आपण जेंव्हा एकत्र जमतो तेंव्हा नेमकं काय शोधतो? तर आपलं मराठीपण. आपलं प्रत्येकाचं मराठीपण तपशीलाने वेगळं आहे; पण त्याचा पोत एकंच आहे. गुढ्या उभारतो, मंगलमूर्ती मोरया म्हणतो, दीपोत्सवाचा आनंद लुटतो, एवढ्यातच आपलं मराठीपण मर्यादित राह्यलय का? नक्कीच नाही. पसायदान असं नुसतं म्हटलं तर अंत:करणात एक अनामिक कळ उठते. “शंभूराजे” ही हाक आपल्याला वडिलांच्या हाकेपेक्षा जवळची वाटते. कै. पंडित भीमसेनजींचा स्वर्गीय स्वर, पु.ल. देशपांड्यांचं अभिजात साहित्य, सचिन तेंडूलकरची प्रत्येक शतकी खेळी, लता-आशा ह्यांची संगीतातली दैदिप्यमान कारकीर्द इतकंच नव्हे तर सुलोचनबाईंची बेफाट लावणी सुद्धा. आपल्या अंत:करणात कायमचं घर करून बसलेल्या ह्या आठवणी,  मर्मबंधातल्या अश्या किती ठेवी आणि त्याभोवती गुंतून पडलेल्या मराठीपणाच्या किती आठवणी. हे मराठीपण!

 

ह्या सगळ्यासकट आपण दूरदेशी आलोत. दुधात साखर मिसळावी तसे एकरूप झालोत पण अंतर्यामी जपलेलं हे मराठीपण विश्वात्म होण्यानं बिलकुल कमी होणार नाहीये. उत्तर अमेरिकेत हा मराठी उपक्रम आज विशाल वटवृक्षाप्रमाणे विस्तृत झाला आहे हेच जगाला दाखवायला आपण इतक्या वर्षांनी इथे परत येणार आहोत. मुंबईचा, पुण्याचा, नागपूरचा, नाशिकचा, औरंगाबादचा, कोल्हापूरचा, रत्नागिरीचा अश्या असंख्य मराठी रूपांमध्ये विश्वात्म मराठी असे एक नवे सक्षम रूप उभे आहे. हा आपला सार्थ अभिमान आहे. चला तर मंडळी, पुढच्या वर्षीच्या जुलै मध्ये आपण सर्वजण एकत्रित येउन हा माय मराठीचा महोत्सव साजरा करूया!

 

हे अधिवेशन सर्वार्थाने यशस्वी व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

धन्यवाद,

नितीन जोशी

अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका

Dear Friends,

 

Welcome to the BMM 2017 Convention web site! It gives me immense pleasure to invite all of you to attend this spectacular convention in July 2017. The legendary Chicago architect Daniel Burnham said, “Make no little plans; they have no magic to stir men’s blood…..Make big plans, aim high in hope and work.” A team of over 300 committed volunteers representing Maharashtra Mandal, Detroit are set to do exactly the same thing!

 

Detroit has been a back bone of industrial revolution in America. There are a lot of Marathi engineers who have been working at important positions in the auto industry in Detroit area. Their ingenuity, dedication and perseverance have a proven track record. Marathi professionals and entrepreneurs in the area are involved in all other spheres from medicine, IT, finance, manufacturing, and construction as well, just to name a few. The tremendous support from the entire Marathi community is really the biggest asset to Maharashtra Mandal, Detroit and to the BMM 2017 convention.

 

The Biennial convention is a flagship activity of Bruhan Maharashtra Mandal (BMM) and I am quite confident that this convention will prove to be one of the best ever! It is a celebration of our language, culture and talent. We will ensure that there is something of interest for every attendee in the convention. Kids, young adults, families and seniors will enjoy it equally. It will showcase talented individuals in all phases of life.

 

All of us have come to the North American continent from different places in Maharashtra or India for that matter. All of us have worked hard to fulfill our big aspirations and have been successful in assimilating in every walk of American life. However, at the very core we strive to preserve our language , our culture and our values. To get together in a large number for BMM convention gives us a feeling of getting back to our roots and that I think that is the prime reason every Marathi individual in North America should attend the BMM 2017 Convention!

 

Once again, please accept my invitation to attend. See you at the convention.

 

Sincerely Yours,

 

Niteen Joshi

President, BMM North America