nigeria

“आपली मराठी आपले विश्व” हा उपक्रम सुरु केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ ऑफ नायजेरिया तर्फे आपले हार्दिक अभिनंदन. खरंच – मराठी पाऊल पडते पुढे! तुमच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर BMM२०१७ च्या अधिवेशनासाठी काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. महाराष्ट्र मंडळ ऑफ नायजेरिया हि संस्था लागोस, नायजेरिया येथे प्रस्थापित झालेली आहे. (पश्चिम आफ्रिका) आमच्या येथे जवळ जवळ ८०० महाराष्ट्रयीन मंडळी नायजेरियात आहेत. आमची कमिटी:

श्री विजय निकते, संस्थापक सदस्य

श्री श्याम बारकाळे, सल्लागार

श्री गिरीश जयकर, अध्यक्ष

श्री नितीन नगीने, उपाध्यक्ष

श्री सुधीर संखे, सचिव

श्री श्रीरंग अवधानी, सचिव

श्री सत्यम चाळके, खजिनदार

व इतर कमिटीचे सदस्य

 

दर वर्षी आम्ही मकर संक्रांत, गणेश चतुर्थी आणि महाराष्ट्र दिन साजरा करतो. आम्ही क्रीडा महोत्सव आणि पिकनिक सुद्धा आयोजित करतो. .मकर संक्रांत हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या इथली मुले महाराष्ट्रातला एखादि कल्पना घेऊन रंगमंचावर साजरा करतात. गणेश उत्सव हा तर दहा दिवसांचा उत्सव इथल्या देवळात साजरा केला जातो. खास सांगायची गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती आम्ही इथेच लागोसची माती वापरून स्वतः बनवतो. मागच्या वर्षी सजावटीला थर्मोकोलचं छोटंसं देऊळ बनवलं होतं. आमच्या क्रीडा महोत्सवाला खूप छान प्रतिसाद मिळाला. पिकनिकला सुद्धा खूप मजा येते.आमची वेब साईट तयार होते आहे. आम्ही काही दिवसातच त्याची घोषणा करू, तेंव्हा त्याची लिंक आपल्याला जरूर पाठवू.लागोस मध्ये (म्हणजे नायजेरियाच्या राजधानीत) महाराष्ट्र मंडळ हे सर्वात जास्त ऍक्टिव्ह आहे आणि आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची नेहेमीच स्तुती केली जाते. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणण्याखेरीज, महाराष्ट्र मंडळ ऑफ नायजेरिया इतर अनेक सामाजिक कामे सुद्धा करते.

– मंडळाने NAAM फाऊंडेशनला डोनेशन केली आहे..

– लागोस मध्ये बांधल्या जाणाऱ्या Indo-Eye Care हॉस्पिटल साठी आम्ही आर्थिक मदत केली आहे.

– मंडळ वेळोवेळी रक्तदान शिबिरे सुद्धा आयोजित करते.

लागोस मधून काही जणांचा तरी BMM अधिवेशनाला येण्याचा विचार आहे. परत एकदा, तुमच्या ह्या उपक्रमाला आमचा पूर्ण पाठिंबा.

!! जय महाराष्ट्र !!

On behalf of Maharashtra Mandal of Nigeria (MMN), we congratulate you for taking this initiative.  Truly – Marathi Paul Padate Pudhe -.  We are keen to work closely with you and entire team to make it a great success. MMN is based in Lagos, Nigeria (West Africa). We have around 800 Maharashtrians in Nigeria.  Our team is as under :

Mr. Vijay Nikte – Founder member

Mr. Shyam Barkale – Advisor

Mr. Girish Jaykar – President

Mr. Niteen Nagine – Vice President

Mr. Sudhir Sankhe – Secretary

Mr. Shrirang Avdhani – Secretary

Mr. Satyam Chalke – Treasurer and

Other committee members

Every year we celebrate – Makar Sankrant, Ganesh Festival & Maharashtra Diwas. We also arrange Krida Mahotsav and Picnic.

Makar Sankrant is a cultural program based on some theme in Maharashtra (like festival etc.) wherein kids perform live on the stage.

Ganesh Festival is 10 day celebration in temple. Speciality of our Ganesh Festival is that Ganesh Idol is prepared here in Lagos with local sand by Nigerian artist. Last year, we prepared small temple in Thermacoal.  I will share the photo / Video with you. For Krida Mahotsav, we got very good response last year.Picnic is always a fun. Our website is ready, but we will officially announce it shortly and then I can share the link with you. In Lagos, Maharashtra Mandal is most active and highly praised for its cultural activities. Besides, bringing Maharashtrians together MMN actively involves itself in other philanthropic activities.

  • MMN has donated to NAAM Foundation in Maharashtra.
  • We have also donated to upcoming Indo-Eye Care Hospital in Lagos.
  • MMN also conduct Blood Donation camp in Lagos.

Once again, we appreciate your initiative and assure you of our support.

Jai Maharashtra!!!