Dr. Parimal Kopardekar

sameersarvat2डॉ. परिमल कोपर्डेकर

‘प्रकाशझोतात – डॉ. परिमल कोपर्डेकर’
शब्दांकन – संजय मेहेंदळे
आधुनिक ड्रोनाचार्य (https://www.youtube.com/watch?v=iDjZzysw1MY)
आकाशात तीन हजार कोटी, नव्वद दशलक्ष, त्रेचाळीस हजार, पाचशे बत्तीस तारे आहेत असं जर ‘मी’ सांगितलं; तर नक्कीच कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही. पण हेच जर ‘असं मी नासाच्या साईटवर वाचलं’ असं म्हंटलं तर… ‘हो का! असेल बुवा!’ असं म्हणुन शरणागती पत्करतील.
असा नावलौकिक आणि दबदबा असलेल्या नासा मध्ये Senior Technologist म्हणून काम करणाऱ्या डॉ. परिमल कोपर्डेकरांची मुलाखत घ्यायची वेळ आली तेंव्हा मला नाही म्हंटलं तरी थोडंसं दडपण आलं. एकलव्याला द्रोणाचार्यांपर्यंत पोचण्यास जेवढ्या अडचणी आल्या नसतील तेवढ्या अडचणी मला या आधुनिक ड्रोनाचार्यांपर्यंत पोचतांना आल्या. एकतर डॉ. परिमल त्यांच्या काम, लेक्चर्स, प्रवासानिमित्त अतिशय बिझी आणि वरून नासा चा थोडासा ‘लाल फितीचा’ कारभार…. पण एकदा का ओळखदेख झाली की एव्हढा मोठा माणूस वागा-बोलायला किती साधा आहे याचं प्रत्यंतर आल्यावाचून रहात नाही.
वडील IAS ऑफिसर असल्याने बदलीची नोकरी, त्यामुळे शालेय शिक्षण मुंबई, कल्याण, रत्नागिरी अशा त्रिस्थळी. त्यानंतर मुंबईतल्या V.J.T.I. संस्थेतून ८९ साली इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर Buffalo University मधून MS व त्यानंतर Cincinnati University मधून PhD असा शैक्षणिक प्रवास करत असतांना एकीकडे शिक्षण, एकीकडे part time नोकरी असं चालू होतं. या प्रवासादरम्यान ‘Air Traffic Management’ या विषयावरील एका भाषणाने प्रभावित होऊन तोच विषय PhD साठी निवडला.
खेळण्यातली रिमोट कंट्रोल ड्रोन विमाने, ड्रोन या मानवरहित विमानांनी करायचे हल्ले, Google व Amazon तयारी करत असलेले ‘Drone Delivery’ या व अशा अनेक कारणांनी ‘ड्रोन’ या शब्दाची व्याप्ती आता सामान्य माणसापर्यंत पोचली आहे. ड्रोन, त्यांची झपाट्याने वाढत संख्या व त्यापेक्षाही झपाट्याने वाढत जाणारा व्यावसायिक वापर डॉ. परिमल यांच्याच शब्दात – Drones or unmanned aircraft systems are expected to be $80B industry within 10 years, and 2.6M drones are forecasted by 2020. In order to accommodate them safely, a traffic management system is needed. Parimal conceptualized this need in early 2013. He developed a concept called Unmanned Aircraft System Traffic Management (UTM). Started working on concept, architecture, and technology to safely accommodate large-scale small Unmanned Aircraft Systems (UAS) operations in the airspace. His team is working with many industry, academia, and government collaborators. The UTM concept has been followed by Europe, Japan, Korea, and many other countries.
Drones च्या या वाढत्या वापरामुळे Sky is the limit या म्हणीत बदल करत, आकाश संचारालाच मर्यादा/नियम लावण्याचं काम आता करावं लागतं आहे FAA आणि NASA यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या प्रकल्पाचे डॉ. परिमल हे मुख्य आहेत. या प्रकल्पाविषयी माहिती तांत्रिक बाबींत खूप खोलात न शिरता – UTM provides an ecosystem for airspace operations where such services are not available or provided currently. The goal of the UTM is to enable multiple unmanned aircraft systems simultaneously operating in the same airspace safely. The UTM research consists of authentication, scheduling and planning, geo-fencing, weather avoidance, track and locate, demand/capacity management, and contingency management. Currently, these drones are only allowed to operate within visual line of sight however many businesses need capability to operate beyond visual line of sight. In order to operate beyond visual line of sight, it is important that these drones will stay clear of each other and other manned aircraft. That’s where UTM helps – it allows an operator to schedule and plan an area of operation that will be free of any constraints in the airspace as well as will stay clear of other operations. It further incorporates actual position of the drone in real-time to ensure that the drones are staying within their planned area of operation. UTM also creates alerts when a drone drifts away from a planned area of operation and could pose hazard to other drone or drift into geo-fenced area. The UTM’s implementation will allow overall safety of operations, a key requirement for its wide-spread usage.
त्यांच्या गावातल्या महाराष्ट्र मंडळ व BMM विषयी विचारलं असता, कामात सतत व्यग्र असल्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या साऱ्याच कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नसल्याची खंत व्यक्त केली. पण ९३ सालच्या बाल्टीमोर येथे भरलेल्या BMM संमेलनाला उपस्थित होतो अशी आठवण आर्वजून सांगत या वेळेच्या ग्रँड रॅपिड्स च्या BMM अधिवेशनाला नक्कीच हजेरी लावीन असही सांगितलं. या संशोधकाला प्रत्यक्ष भेटण्याची आशा बाळगत आमच्या BMM च्या टीमतर्फे त्यांना २०१७ च्या अधिवेशनासाठी आग्रहाचे निमंत्रण व त्यांच्या प्रकल्पाविषयी शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेतला