amm-banner

अल्बनी महाराष्ट्र मंडळ

 

अल्बनी महाराष्ट्र मंडळाची सुरुवात जानेवारी २०१५ रोजी झाली. त्यामुळे आमचं मंडळ अजून बाल्यावस्थेत आहे म्हणायला हरकत नाही! पण मराठी माणसाचा उत्साहच असा असतो की मराठमोळं वातावरण एकदा का रुजायला लागलं की त्याची जोमाने भरभराट व्हायला लागते.

 

सध्या मंडळातले बरेचसे सभासद माल्टा इथल्या ‘जनरल इलेक्ट्रिक’ किंवा ‘ग्लोबल फाऊंड्रीज’ कंपनीत कामाला आहेत. तर काही लोक न्यूयॉर्क राज्याच्या सरकारी विभागात काम करतात. गेल्या दोन वर्षांत आम्ही ‘नटसम्राट’, ‘अस्तु’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा चित्रपटांचं स्क्रिनिंग करून दर्जेदार मराठी चित्रपटांचा आनंद घेतला. ‘ध्वनी’ (संगीत), ‘सुरभी इंडिया’ (संगीत) आणि ‘जय भारत ढोल ताशा पथक’ यांसारखे स्थानिक संघ मंडळाला प्रेमाने पाठिंबा देतात. या वर्षी पहिल्यांदा ‘अल्बनी हिंदू टेंपल’ च्या सहकार्याने अल्बनी महाराष्ट्र मंडळाने महाराष्ट्र दिन आणि गुढी पाडवा साजरा केला.
जी माणसं कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपन्न परंपरेची आणि संस्कृतीची सेवा करू इच्छितात अशांसाठी अल्बनी महाराष्ट्र मंडळाचा मंच नेहेमीच खुला असेल..! BMM २०१७ च्या अधिवेशनासाठी अल्बनी महाराष्ट्र मंडळाकडून हार्दिक शुभेच्छा!!

Albany Maharashtra Mandal

 

AMM’s Mission: To provide a common platform for Capital Region’s Marathi community in order to cultivate and spread the rich cultural traditions of Maharashtra.

 

Initiated in January 2015, the Albany Maharashtra Mandal is a very young sibling among the Maharashtra Mandals of USA. Our Mandal caters to the capital district of Albany, NY.

 

In the 2 years that Albany Maharashtra Mandal has been in existence, it has screened Marathi cinemas like नटसम्राट, अस्तु, कट्यार काळजात घुसली for its patrons. AMM as we fondly call our Mandal is aptly supported by local talent groups, like Dhwani (ध्वनी) the music group, Surabhi India – the music group and Albany’s own जय भारत ढोल तशा पथक (Dhol Tasha Troupe).

 

Albany Maharashtra Mandal organized the very first Maharashtra Diwas in Albany in conjunction with Albany Hindu Temple as well as celebrated Gudhi Padwa for the first time in 2016.

 

We invite all groups that can contribute to our rich Maharashtra heritage and culture and use Albany Maharashtra Mandal as a platform to connect, prosper and grow in the community.