Abhigit Gholap

abhi gholap

“अजि म्या ब्रह्म पाहिले”……. च्या चालीवर;  “आज मी ‘Midas’ शी बोललो”…… अशी काहीशी माझी अवस्था, “अभी”शी बोलल्यावर झाली होती.

अभिजित घोलप……. हा माणूस IIT (मुंबई) इथून graduate होतो काय……. अमेरिकेत येऊन नाममात्र भांडवलावर Bio Imagene कंपनी सुरु करतो आणि अवघ्या दहा वर्षात hundred million पर्यंत वाढवतो काय……. काही वर्षांसाठी भारतात परत जातो आणि सिनेमा निर्मितीसारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात पदार्पणातच ‘देऊळ’ सारख्या अभिजात कलाकृतीची निर्मिती करतो काय…… सारंच कसं अभिच्या परीसस्पर्शानं आणि अर्थात कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कामावरील निष्ठा यांनी नटलेलं. जिथं IIT ला प्रवेश मिळवणं हेच मुळी बऱ्याच जणांसाठी स्वप्न असतं, त्या पार्श्वभूमीवर ही यशाची चढती कमान खरोखरंच स्तिमित करणारी आहे.

IIT त असतांना professor नाग यांच्या; “तुम्ही जेंव्हा नोकरी स्वीकारता, तेंव्हा दुसऱ्या एकाची संधी हिरावता” वाक्याने प्रभावित होऊन, कोणाची संधी हिरावण्यापेक्षा; “लोकांसाठी संधी निर्माण करण्याच्या” ध्यासाने प्रेरित होऊन Bio Imagene कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. Quarter million dollars पासून सुरु केलेल्या कंपनीने, ROCHE ने विकत घेईपर्यंत, hundred million dollars पर्यंत घोडदौड केली. दोन कंपन्या acquire पण केल्या….. आज मागे वळून पहातांना हा प्रवास सुखद वाटत असला तरी…… एका वळणावर…. एका medical device च्या संदर्भात USFDA ची आलेली नोटीस…… “कंपनी, production, सारं काही बंद करावं लागतं की काय” ची टांगती तलवार…… सातत्याने सहा महिने FDA शी केलेला कायदेशीर संघर्ष…… यातून तावून-सुलाखून कंपनी अधिकच जोमाने पुढे झेपावली. अभि सांगत होता; “मिळवलेल्या अकरा patents इतकाच हा संघर्षही महत्वाचा होता”.

कौटुंबिक गरजांना प्राधान्य देऊन, Bio Imagene कंपनी विकल्यानंतर काही वर्षांकरता भारतात परतल्यावर, सिनेमानिर्मितीच्या क्षेत्रात उतरायचं ठरवलं…… देविषा फिल्म्स, देऊळ सिनेमा यांविषयी बोलतांना अभि सांगत होता.……

निव्वळ “धंदा” म्हणून मी व्यवसायाकडे कधीच बघत नाही. लोकांना नेहमीच उत्तम product देण्यावर माझा भर असतो. ‘देऊळ’ च्या निर्मितीच्यावेळी मला मराठी सिनेमासृष्टीत “Think BIG” चा अभाव, “थोडक्यात भागवण्याची वृत्ती”, “मार्केटिंगकडे होत असलेलं अतोनात दुर्लक्ष” ह्या गोष्टी ठळकपणे जाणवल्या. त्यामुळे मी सुरुवातीलाच उत्तम कथा आणि नामवंत कलाकार यांचा आग्रह धरला होता. ‘वळू’च्या कामगिरीमुळे गिरीश व उमेश कुलकर्णी बद्दल विश्वास होताच; जो पुढे सार्थ ठरला. मार्केटिंगबाबत “तुम्ही सिनेमा लोकांपर्यंत पोचवा; मग लोक आपोआपच सिनेमा बघतील” हे सूत्र आग्रहाने अवलंबले. “Think BIG” चा विचार करता, ‘देऊळ’ ५०० सिनेमागृहांमध्ये release करायचे ठरवले. ज्यावेळी SRKचा “Ra One” मंगळवारी release झाला होता ५५० थिएटर्समधे; त्याच आठवड्यातल्या शुक्रवारी आम्ही ‘देऊळ’ release केला ५०० थिएटर्समधे. यात थोडी रिस्क होती पण सिनेमाचं shelf life, जे पहिल्या weekend च्या turn over वर जास्त अवलंबून असतं, त्याचा फायदा आम्ही घ्यायचा ठरवलं आणि ही क्लुप्ती यशस्वी ठरली.…. ‘देऊळ’ने weekend ला box office वर चांगला धंदा केला…. इतका; की आम्ही पुढच्याच आठवड्यात एकूण ५४३ थिएटर्समधे ‘देऊळ’ release केला.…. ‘देऊळ’ मग पुढे १०० दिवस चालला…… box office चं collection चांगलं होत होतं…… आणि “सोनेपे सुहागा” म्हणावं तसं ‘देऊळ’ने ‘best feature film’, ‘best screenplay’, ‘best actor’ अशी तीन राष्ट्रीय पारितोषकं पण पटकावली. ‘शामची आई’, ‘श्वास’ या सिनेमांनंतर; राष्ट्रीय पारितोषिक मिळवणारी ‘देऊळ’ ही केवळ तिसरी मराठी film आहे.

हे सगळं सांगत असतांना; lights, camera, action असे किंवा इतर फिल्मी संवाद तोंडी न येता अभिच्या तोंडून marekting, resources project planning, timelines, distribution इत्यादी typical management भाषेतले शब्द ऐकून “मी सिनेमानिर्मितीकडे एक वेगळं business model म्हणून बघतो” असं अभि जे सांगत होता, ते अगदी पटत होतं….”देऊळ”ला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांशिवाय “Rajiv Gandhi Award” (२००९), “IT Innovation Award” (२०१०), “Deloitte Business Award” (२०११), “Sillicon Entrepreneur Award” (२०१६) इत्यादि अन्य पुरस्कारांनी अभिला सन्मानित करण्यात आलं आहे.२०१४ साली अमेरिकेत परत आल्यावर पुनःच हरिओSम म्हणत Optra System या आपल्या कंपनीच्या दुसऱ्या inning मध्ये, already दोन पेटंटस मिळवून, आपल्या परिसस्पर्शाने नवीन कंपनीची वाटचाल कशी असेल याची चुणूक दाखवली आहे. २०१० सालीच सुरु केलेली ही कंपनी आता Optra HEALTH, Optra SCAN, आणि iPhronesis या कंपन्यांचा ‘group of companies’ बनून वेगाने वाटचाल करीत आहे. या कंपन्यांद्वारे अभिने अडीचशेच्यावर लोकांना, भारतात व अमेरिकेत, नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून दिली आहे.

अभिने आपणहून BMM २०१७ च्या team शी संपर्क साधून शक्य होईल त्या सर्व प्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. त्याबद्दल त्याला विशेष धन्यवाद देऊन, त्याच्या आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत BMM २०१७ ला उपस्थित रहाण्याचे आग्रहाचे निमंत्रण देऊन त्याचा निरोप घेतला.

शब्दांकन – संजय मेहेंदळे