आपली मराठी, आपले विश्व

राघोबादादांनी अटकेपार झेंडा लावला आणि अठराव्या शतकात पहिल्यांदा आपल्या मराठीने देशाच्या सीमा ओलांडल्या. आज ग्लोबलायझेशनमुळे मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आहे. जर प्रत्येक मराठी माणसाने मायमराठीचा भगवा झेंडा हातात उंच धरला आणि आपण वरून जर त्या जगाच्या नकाशाकडे पाहू शकलो, तर ते चित्र रसमलाई किंवा नारळी भातावर केशर पसरल्यासारखं दिसेल!

 

कुठे कुठे आहेत आपले मराठी बांधव? आपली संस्कृती, कला, साहित्य आणि भाषेवरचं प्रेम जपण्यासाठी विविध देशांत, विविध शहरांत ते काय प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतील? आपण जर उद्या कामानिमित्त दुसऱ्या देशांत, अनोळखी शहरात गेलो तर मराठी मातीचा अस्सल वास, पुरणपोळीचा गोडवा किंवा ढोल-ताशा-तुतारीचा निनाद आपल्याला कुठे मिळू शकेल…? – ‘आपली मराठी, आपले विश्व’ हे सदर BMM 2017 ची टीम आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे. जगातल्या विविध मराठी मंडळांना प्रकाशझोतात आणत आहे. मराठी बांधवांना एकमेकांच्या जवळ आणत आहे. आपल्या भाषेला योग्य तो मान मिळवून द्यायचा यत्न करत आहे, जगातलं हे ‘केशर’ आणखी दरवळायचा प्रयत्न करत आहे..!

 

हे विश्वचि माझे घर (This world is my home). This profound statement was made in Marathi by Sant Dnyneshwar Maharaj in 16th century. But Maharastrians in 21st century are making it possible! Literally !! आपली मराठी, आपले विश्व (Our Marathi, Our World) initiative by BMM 2017 is to celebrate our presence in all parts of the world. We will show case various international mandals on BMM2017 face book and web site. Stay tuned to feel proud of our brothers, sisters, friends and relatives from across the world!

parth
karachi
maskat
nigeria
netherland-banner
shanghai
singapore1